ETV Bharat / state

24 परदेशी अन् 5 भारतीय तबलिगी सदस्य नगरमधील अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर

आज 24 परदेशी नागरिक व ५ भारतीयांना नगरमधील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

author img

By

Published : Apr 18, 2020, 1:30 PM IST

24 foreign nationals and 5 Indian Tbiligi appear in court in Nagar24 foreign nationals and 5 Indian Tbiligi appear in court in Nagar
24 foreign nationals and 5 Indian Tbiligi appear in court in Nagar

अहमदनगर - तबलिगी जमातीच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक हे कायद्याचे उल्लंघन करून नगरमध्ये राहिल्याने त्यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. आज 24 परदेशी नागरिक व ५ भारतीयांना नगरमधील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

24 परदेशी अन् ५ भारतीय तबलिगी सदस्य नगरमधील अहमदनगर जिल्हा कोर्टात हजर

सिव्हिल हॉस्पिटलमधून सोडल्यानंतर 24 परदेशी नागरिक व ५ भारतीयांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज नगरमधील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 24 विदेशी 5 भारतीय असे 29 तबलिगी जमातीचे सदस्यांना अहमदनगर जिल्हा न्यायालयात आणले आहे. 5 भारतीय हे भाषांतरकार म्हणून त्यांच्यासोबत होते. तसेच आणखी 5 विदेशी तबलिगी हे कोरोना पॉझीटिव्ह असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना नंतर अटक करण्यात येणार आहे.

मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक व्हिसाचा गैरवापर करत असल्याचे उघडकीस आले. पर्यटन व्हिसावर आलेले असताना ते व्हिसामधील अटींचे उल्लंघन करून धर्मप्रसार करत असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. त्यामुळे नगरला आलेले २४ परदेशी नागरिक आणि त्यांना मदत करणाऱ्या अन्य पाच नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. नगरमधील भिंगार, जामखेड, नेवासा पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी एकूण 29 जणांना अटक केली. यात 24 विदेशी तर पाच भारतीय दुभाषांचा समावेश आहे. हे 24 विदेशी नागरिक जिबुती, बेनिन, डिकोटा, आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्रूनेई येथील आहेत. दिल्लीतील मरकजहून नगर जिल्ह्यात एकूण 35 तबलीगी आले होते. यात 29 विदेशी नागरिकांचा समावेश होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.