ETV Bharat / state

Sai Temple Donation : रामनवमी उत्सव काळात साईचरणी तब्बल 4 कोटींची देणगी; लाखो भक्तांनी घेतले दर्शन

author img

By

Published : Apr 1, 2023, 5:57 PM IST

Updated : Apr 1, 2023, 6:58 PM IST

शिर्डी साईबाबा संस्थानच्यावतीने तीन दिवस साजरा करण्यात आलेल्या श्रीरामनवमी उत्सव काळात सुमारे २ लाख साईभक्‍तांनी साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. साई संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली. रामनवमी उत्सव काळात साईचरणी तब्बल 4 कोटींची देणगी भक्तांनी दिली आहे.

Sai Temple Rama Navami Donation
रामनवमी उत्सवात 2 लाख भक्तांनी घेतले साई समाधीचे दर्शन

अहमदनगर/शिर्डी : श्रीरामनवमी उत्‍सव मोठ्या उत्‍साही वातावरणात पार पडला असून, या उत्‍सवकाळात साईभक्‍तांकडून श्रीसाईबाबा संस्‍थानला विविध माध्‍यमांतून भरभरून देणगी प्राप्‍त झाली आहे. यामध्‍ये दानपेटीतून ०१ कोटी ८१ लाख ८२ हजार १३६ रुपये, देणगी काउंटरद्वारे ७६ लाख १८ हजार १४३, डेबिट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी, मनी ऑडर आदींद्वारे ०१ कोटी ४१ लाख ५२ हजार ८१२ रुपये देणगी रक्‍कम स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने १७१.१५० ग्रॅम (रुपये ०८ लाख ६४ हजार ७२३) व चांदी २७१३ ग्रॅम (रुपये ०१ लाख २१ हजार ८१३) देणगी प्राप्‍त झालेली आहे. अशाप्रकारे विविध मार्गाने एकूण ०४ कोटी ०९ लाख ३९ हजार ६२७ रुपये देणगी प्राप्‍त झाली आहे.

Sai Samadhi During Ramnavami Festival
रामनवमी उत्सवकाळात साईभक्तांकडून मिळालेली देणगी मोजताना

उत्सवकाळात लाखो रुपयांची देणगी प्राप्त : तसेच या व्‍यतिरिक्‍त उत्‍सवकाळात सशुल्‍क व ऑनलाईन पासेसद्वारे एकूण ६१ लाख ४३ हजार ८०० रुपये देणगी प्राप्‍त झाली. तसेच श्री साईप्रसादालयात उत्‍सवकाळात १,८५,४१३ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर ३२,५३० साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला. याबरोबरच ३२,५०० तीन नगाचे लाडू पाकीटे व ३,३९,५९० एक नगाचे लाडू पाकिटांची विक्री करण्‍यात आली असून, याद्वारे ४२ लाख ०८ हजार ४०० रुपये प्राप्‍त झाले आहे. तर १,१६,००० मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे दर्शनरांगेतून साईभक्‍तांना वाटप करण्‍यात आले.

Sai Samadhi During Ramnavami Festival
रामनवमी उत्सवकाळात साईचरणी मोठ्या प्रमाणात देणगी

उत्तम प्रकारे साईभक्तांची निवासी व्यवस्था : तसेच श्री रामनवमी उत्‍सवकालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास, द्वारावती भक्‍तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्‍थानांद्वारे ४३,४२४ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेसाठी उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात ५,९५४ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. अशी एकूण ४९,३७८ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली असल्‍याचे जाधव यांनी सांगितले.

उत्सवकाळा सुरक्षारक्षक आणि भक्तांमध्ये हाणामारी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानमध्ये साईभक्तांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षारक्षक साईभक्तामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. साई मंदिर परिसराच्या पाच क्रमांकाच्या गेटमधूनच भाविकांना बाहेर सोडले जाते, मात्र या दरवाजातून मंदिरात प्रवेश देण्याच्या कारणावरुन साई भक्तांने सुरक्षारक्षकांसोबद वाद घातला. त्यामुळे आगोदर साईभक्त सुरक्षारक्षकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले.

हेही वाचा : Sanjay Raut Threat Case : YouTube वर लॉरेन्सचे व्हिडिओ पाहिले अन् दिली संजय राऊतांना धमकी; आरोपी होता दारुच्या नशेत, पोलिसांची माहिती

Last Updated : Apr 1, 2023, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.