ETV Bharat / state

Corona in Ahmednagar : टाकळी ढोकेश्वरच्या जवाहर नवोदय निवासी विद्यालयातील 16 विद्यार्थी आणि 3 शिक्षक कोरोनाबाधित - टाकळी ढोकेश्वर जवाहर नवोदय निवासी विद्यालय

केंद्र सरकारच्या जवाहर नवाेदय विद्यालयातील 16 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांना काेराेनाची लागण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सर्व रुग्णांचे अलगीकरण करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Corona in Ahmednagar
कोरोना
author img

By

Published : Dec 25, 2021, 6:58 AM IST

अहमदनगर - पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरमधील ( Corona in Ahmednagar ) केंद्र सरकारच्या जवाहर नवाेदय विद्यालयातील 16 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांना काेराेनाची लागण ( students of Navodaya school test positive for COVID-19 ) झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माेठ्याप्रमाणात काेराेनाबाधित विद्यार्थी आढळल्याने जिल्हा प्रशासन आणि आराेग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली असून या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांवर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात अलगीकरण कक्षात दाखल करून उपचार सुरू केले आहे.

कोरोना परिस्थितीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले
केटरिंग, भाजीपाला सेवा यातून विद्यार्थी-शिक्षक बाधित -

याबाबत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले ( Dr Rajendra Bhosale on COVID-19 ) यांनी सांगितले की, ही निवासी शाळा असून येथे 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेमध्ये केटरिंग आणि भाजीपाला सेवा देणाऱ्या लोकांकडून हा कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. यात 16 विद्यार्थी आणि 3 शिक्षक बाधित आढळल्याने आता सर्व विद्यार्थी, शिक्षक, इतर स्टाफ तसेच केटरिंग, भाजीपाला आदी सेवा देणारे आणि इतर संपर्कात आलेल्या व्यक्तीची आटीपीसीआर तपासणी सुरू केली आहे.

ओमायक्रॉनचा शिरकाव आणि बाधित विद्यार्थी -

सर्व बधितांवर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे नायजेरीयातुन आलेल्या तीन व्यक्तींपैकी आई आणि मुलगा हे ओमायक्रोन बिषाणूने बाधित निष्पन्न झाल्याने अधिकची काळजी जिल्हा प्रशासन घेत आहे.

नगर जिल्ह्यात 'नाे लस, नाे एन्ट्री' -

ओमायक्राॅनचा शिरकाव आणि काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी लस घेतली नसणाऱ्यांवर निर्बंध जारी केले आहेत.

जिल्ह्यात कडक निर्बंध लागू -

शासकीय, निमशासकीय, खासगी, व्यावसायीक, औद्योगिक, हाॅटेल, रेस्टाॅरंट, शाॅपिंग माॅल, नाट्यगृहे, सिनेमागृहे, लाॅन्स, मंगल कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, मेळावे यांच्यासह सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमात 'नाे लस, नाे एन्ट्री'चे निर्बंध असल्याचे जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी सांगितले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून तसे शासकीय काढण्यात आले आहेत.

हेही वाचा - MIG 21 Accindent in Jaisalmer : मिग-२१ जैसलमेरमध्ये कोसळले; वैमानिकाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.