अहमदनगर - जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत १६ ने वाढ झाली आहे. गंभीर बाब म्हणजे, हे यातील बहुतांश जण बाहेरून जिल्ह्यात आले होते. तर दुसरीकडे सुखद बाब म्हणजे, दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात एका सहा वर्षीय मुलीचा समावेश आहे.
रविवारी १२४ जणांचे अहवाल आले. यात १०८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. तर १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बहुतांश जण मुंबईहून नगर जिल्ह्यात आले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता १४७ वर पोहोचली आहे.
मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेल्या सहा वर्षीय मुलीने कोरोनाला मात दिली आहे. याशिवाय, संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका व्यक्तीला नाशिक येथून डिस्चार्ज देण्यात आला. या दोघांना मिळून आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७० इतकी झाली आहे.
हेही वाचा - जमीन खरेदीप्रकरणी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांना औरंगाबाद हायकोर्टाची नोटीस
हेही वाचा - रेशनिंगच्या तांदळाचा काळाबाजार, गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ जप्त; पाच जणांवर गुन्हा दाखल