शिर्डी (अहमदनगर) - साईबाबांच्या दर्शनासाठी आता ऑफलाइन पास देण्याची व्यवस्था साई संस्थानच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. कोरोनामुळे गेले काही दिवस काही ठरविकच लोकांना ऑनलाइन पद्धतीने पास दिल्या जात होते. मात्र या निर्णयामुळे भाविकांना दर्शन घेणे सोयिस्कर होणार आहे.
कोरोनाचा नियम पळत साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी 7 ऑक्टोबर रोजीपासून खुले करण्यात आले आहे. दरम्यान ऑनलाइन दर्शन पास बुकिंग करून येणाऱ्या भाविकांचा साई दर्शन दिले जात होते. तसेच दररोज फक्त 15 हजार भाविकांचा साईबाबांचे दर्शन देण्याचा निर्णय साई संस्थान आणि जिल्हाधिकारी यांनी घेतला होता. मात्र या निर्णयामुळे अनेक भाविकांना साई दर्शन पासून वंचित राहावे लागत होते. त्याचबरोबर अनेक अडचणींचा सामना भाविकांना करावा लागत असल्याचा तक्रार भाविकांनी केल्या होत्या. यामुळे आता पूर्वीचे 15 हजार ऑनलाइन आणि आणखी 10 हजार ऑफलाइन असे 25 हजार भाविक दररोज साई दर्शन घेऊ शकणार असल्याची व्यवस्था साई संस्थानकडून करण्यात आली असल्याची माहिती साई संस्थानचा मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. कोरोना नियमांचे पालन करून शिर्डी मंदिर परिसरात या पासचे वाटप होणार आहे. मात्र भाविकांनी गैरसोय टाळण्यासाठी शक्यतो ऑनलाइन बुकिंग करूनच यावे, असे आवाहन शिर्डी संस्थान तर्फे करण्यात आले आहे. कोरोना काळात मंदीर खुले करण्यास परवानगी देताना फक्त ऑनलाइन दर्शनाची मुभा देण्यात आली होती. मात्र नंतर कोरोनाचे प्रमाण कमी झाले तरीही हीच पद्धत कायम होती. दरम्यान, शिर्डीत भाविकांची गर्दी वाढू लागली. ऑनलाइन पास मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत होता. तर संस्थानलाही भाविकांच्या रोषाला समोरे जाण्याचे प्रकार घडू लागले होते.
हेही वाचा - राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा - चंद्रकांत पाटील