टोकिओ- ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी भारताने चांगली सुरूवात केली. तलवारीबाजी आणि धनुर्विद्यामध्ये यश मिळाले. तलवारबाजीत भारताच्या भवानी देवीने ट्यूनिशियाच्या नादिया बेन अजीजी हिचा पराभव केला. मात्र भवानी देवी नंतरचा सामना जिंकू शकली नाही.
तर दुसरीकडे धनुर्विद्यामध्ये भारतीय पुरूष चमूने कजाखिस्तानचा 6-2 ने पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. येथे त्यांचा सामना दक्षिण कोरियासोबत झाला. कोरियाच्या चमूने हा सामना 6-0 ने जिंकत भारतीय पुरूष चमूला पराभूत केले.
भारतीय फेंसर भवानी देवी ओलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली फेंसर ठरली आहे. तिने आपला राउंड ऑफ 64 बेन अजीजीसोबत 15-3 ने जिंकले आहे. मात्र नंतर ती फ्रांसच्या मैनॉन ब्रूनेटसोबत 15-7 ने पराभूत झाली.
तर अनुभवी टेबल टेनिस खेळाडू अचंता शरत कमलने आपला दुसरा राऊंड जिंकला. मात्र सुतिर्था मुखर्जीने आपला दुसरा राऊंड गमावलं. ती पुर्तगालच्या फू यू सोबत पराभूत झाली. आता भारतीय खेळाडू उद्याचा दिवस सर्वोत्तम बनविण्याच्या तयारीत आहेत. तर हॉकीमध्ये ऑस्ट्रेलियासोबत 7-1 ने पराभूत झाल्यानंतर भारतीय पुरूष हॉकी चमू आपला तीसरा सामना स्पेनसोबत खेळणार आहे. याशिवाय रोइंग, आर्चरी, टेबल टेनिस, शूटिंग, हॉकी, स्विमिंग आणि बॉक्सिंग चे खेळाडू आपली करामत दाखवतील.