टोकियो - भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकत इतिहास रचला. टीम इंडियाने आज जर्मनीचा 5-4 ने पराभव करत 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. भारताच्या या विजयात गोलकिपर पी. आर. श्रीजेश याची भूमिका महत्वाची ठरली. यादरम्यान, श्रीजेशचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये श्रीजेश गोलपोस्टवर बसलेला पाहायला मिळत आहे. याविषयी एका माध्यमाने श्रीजेशला विचारले असता तो म्हणाला, "माझ्यासाठी गोलपोस्ट सर्वकाही आहे. मी माझं संपूर्ण आयुष्य गोलपोस्टवर घालवलं आहे. मी दाखवू इच्छित होतो की, मी या गोलपोस्टचा मालक आहे."
-
Let me smile now 🙏 pic.twitter.com/8tYTZEyakU
— sreejesh p r (@16Sreejesh) August 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Let me smile now 🙏 pic.twitter.com/8tYTZEyakU
— sreejesh p r (@16Sreejesh) August 5, 2021Let me smile now 🙏 pic.twitter.com/8tYTZEyakU
— sreejesh p r (@16Sreejesh) August 5, 2021
दरम्यान, श्रीजेश भारतीय पुरूष हॉकी संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याला भारतीय हॉकी संघाचा 'द वॉल' म्हणूनही ओळखलं जातं. तो दबावात चांगली कामगिरी करण्यात माहीर आहे. पण तो विजयानंतर जल्लोष करताना सहसा पाहायला मिळत नाही. पण ऑलिम्पिकमधील पदकाचा विजय अविस्मरणीय आहे. यामुळे श्रीजेश देखील जल्लोष करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.
मनप्रीत सिंग सामना संपल्यानंतर काय म्हणाला...
सामना संपल्यानंतर मनप्रीत सिंगने माध्यमाशी बातचित केली. यात तो म्हणाला की, या ऑलिम्पिकसाठी खेळाडूंनी खूप परिश्रम केलं होतं. ते पदकास डिजर्व करतात. हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. श्रीजेशने सांगितलं होतं, हा प्रेशरवाला सामना आहे. आपण एन्जॉय करायला हवं आणि नॅचरल खेळ करायला हवं. जर आम्ही पदकाचा विचार करत बसलो असतो तर परफॉर्म करू शकलो नसतो. आम्ही फक्त आमचे बेस्ट दिलं आणि अखेरपर्यंत हार मानली नाही.
हेही वाचा - Tokyo Olympics : पुरूष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर जिंकलं पदक, जर्मनीला नमवत 'कांस्य'वर केला कब्जा
हेही वाचा - भाऊ सर्वांना शुभेच्छा सांग! पंतप्रधान मोदींचा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतला फोन