ETV Bharat / sports

Tokyo Olympic : सुवर्ण स्वप्नभंग! कुस्तीपटू दीपक पुनियाचा उपांत्य फेरीत पराभव - दीपक पुनिया उपांत्य सामना

भारताचा कुस्तीपटू दीपक पुनियाचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. पुरूष फ्री स्टाइल 86 किलो वजनी गटात अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलर याने दीपकचा 10-0 ने पराभव केला.

wrestler-deepak-poonia-lost-semi-final-matches-in-tokyo-olympics
Tokyo Olympic : सुवर्ण स्वप्नभंग! कुस्तीपटू दीपक पुनियाचा उपांत्य फेरीत पराभव
author img

By

Published : Aug 4, 2021, 3:48 PM IST

Updated : Aug 4, 2021, 4:00 PM IST

टोकियो - भारताचा कुस्तीपटू दीपक पुनियाचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. पुरूष फ्री स्टाईल 86 किलो वजनी गटात अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलर याने दीपकचा 10-0 ने पराभव केला.

कुस्तीपटू रवी कुमार दहियाने 57 किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश करत रौप्य पदक निश्चित केले होते. यामुळे दीपक पुनिया देखील अंतिम फेरी गाठत पदक निश्चित करेल, अशी आशा होती. परंतु अमेरिकेच्या कुस्तीपटूने दीपक पुनियाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न धुळीस मिळवले.

अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलर याने पहिल्याच मिनिटाला धोबीपछाड करताना 9-0 अशी भक्कम आघाडी घेतली. त्याने दीपक पुनियावर संपूर्ण निर्विवादीत वर्चस्व मिळवले. त्याने 10-0 असा एकहाती विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला. दीपककडे अजूनही कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे.

उपांत्यपूर्व फेरीत दीपक पुनियाचा सामना चीनच्या जुशेन लीन याच्याशी झाला. तेव्हा दीपकने हा सामना 6-3 अशा फरकाने जिंकला होता. त्याआधी दीपक पुनियाने उपउपांत्यपूर्व फेरीत नायजेरियाच्या कुस्तीपटूला चितपट करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. दीपकने हा सामना 12-1 अशा फरकाने एकतर्फा जिंकला होता.

86 किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत दीपक पुनियाचा सामना नायजेरियाच्या एकरेकेम एगियोमोर याच्याशी झाला होता. या सामन्यात दीपक पुनियाने नायजेरियाच्या कुस्तीपटूवर संपूर्ण वर्चस्व राखले. त्याने पहिला राउंडमध्ये 4 तर दुसऱ्या राउंडमध्ये 8 गुण घेतले. हा सामना दीपक पुनियाने एकतर्फा जिंकला होता.

हेही वाचा - Tokyo Olympics : कुस्तीपटू रवी दहियाने रचला इतिहास, रौप्य निश्चित; आता 'सुवर्ण'साठी भिडणार

हेही वाचा - Tokyo Olympic : भारताला तिसरं पदक; लवलिनाने जिंकलं कांस्य पदक

Last Updated : Aug 4, 2021, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.