लंडन - विम्बल्डन स्पर्धेतील महिला गटात पहिल्या फेरीतच अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. पहिल्या फेरीत जागतिक क्रमांक २ वर असलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिचा धक्कादायक पराभव झाला. तिला कजाकिस्तानच्या यूलिया पुनित्सेवा हिने ७-६, ६-२ ने पराभूत केले.
जागतिक क्रमांक ७ वर असलेल्या रोमानियाची खेळाडू सिमोना हालेपने बेलारुसच्या आलियाक्याद्रा सासनोविकचा ६-४, ७-५ ने पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात चेक गणराज्य की कैरोलिना प्लिस्कोवा हिने चीनच्या लिन झू ला ६-२, ७-६ ने पराभव केला. प्लिस्कोवाने लिन झूला एक तास २२ मिनिटात पराभूत केला.
मात्र, २०१८ साली अमेरिका ओपन जिंकणाऱ्या तसेच या वर्षीची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणारी जपानची ओसाकाला विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले आहे.