लंडन - जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोवाक जोकोव्हिच याने विम्बल्डन स्पर्धेत विजयी शुभारंभ केला आहे. त्याने पहिल्या फेरीत इंग्लंडच्या जॅक ड्रापर याचा ४-६, ६-१, ६-२, ६-२ अशा फरकाने पराभव करत दुसऱ्या फेरीत धडक मारली.
-
Start as you mean to go on…@DjokerNole’s pursuit of a third consecutive Wimbledon title is off to a winning start, beating Jack Draper 4-6, 6-1, 6-2, 6-2#Wimbledon pic.twitter.com/soTVGWBze4
— Wimbledon (@Wimbledon) June 28, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Start as you mean to go on…@DjokerNole’s pursuit of a third consecutive Wimbledon title is off to a winning start, beating Jack Draper 4-6, 6-1, 6-2, 6-2#Wimbledon pic.twitter.com/soTVGWBze4
— Wimbledon (@Wimbledon) June 28, 2021Start as you mean to go on…@DjokerNole’s pursuit of a third consecutive Wimbledon title is off to a winning start, beating Jack Draper 4-6, 6-1, 6-2, 6-2#Wimbledon pic.twitter.com/soTVGWBze4
— Wimbledon (@Wimbledon) June 28, 2021
सार्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोव्हिचने विश्वविक्रमी २०व्या ग्रँडस्लॅमच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याच्या उद्देशाने एक पाऊल पुढे टाकलं आहे. राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांनी प्रत्येकी २०-२० ग्रँडस्लॅम जिंकली आहेत. तर जोकोव्हिचच्या नावे १९ ग्रँडस्लॅम आहेत. विम्बल्डन जिंकून तो या विक्रमाशी बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात आहे.
जॅक ड्रापर याने पहिल्या सेटमध्ये ६-४ ने बाजी मारली. त्यानंतर जोकोव्हिचने आपले आक्रमण धारदार करत तसेच अनुभव पणाला लावत पुढील तिन्ही सेट आरामात जिंकत दुसरी फेरी गाठली. दरम्यान, राफेल नदालने विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे रॉजर फेडररला दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर अद्याप सूर गवसलेला नाही. यामुळे विम्बल्डनमध्ये जोकोव्हिचचे पारडं जड आहे.
हेही वाचा - गतविजेती सिमोना हालेपची विम्बल्डनमधून माघार
हेही वाचा - मोठी बातमी, नदालची विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमधून माघार