लंडन - विम्बल्डन टेनिस स्पर्धेत गतवर्षी उपविजेतेपद पटकावणाऱ्या केव्हिन अँडरसनला यंदाच्या स्पर्धेत पराभव स्वीकाराला लागला. या पराभवासह अँडरसनचे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अँडरसनला अर्जेंटिनाचा खेळाडू गुइडो पेला याने पराभवाचा धक्का दिला.
गुइडो पेलाने केव्हिन अँडसनचा 6-4, 6-3, 7-6 (7-4) असा सेटमध्ये पराभव केला. सामन्यात पहिल्या सर्विसमध्ये केव्हिनने बाजी मारली. मात्र, पेलाने 81 सर्विस पॉईंट जिंकत सामन्यात बाजी मारली. पेलाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्याने पहिला सेट 6-4 असा जिंकत अँडरसनवर दडपण आणले. अँडसन दबावात खेळत असल्याचा फायदा उचलून त्याने आक्रमण अधिक तीव्र केले.
त्यानंतर पेलाने दुसरा सेट जिंकला. तेव्हा अँडसनने सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. त्याने तिसरा सेटमध्ये प्रतिकार केला. मात्र, ट्रायब्रेकरमध्ये पुन्हा पेलाने बाजी मारत सामना जिंकला. अँडसरनच्या या पराभवानंतर पुरुष एकेरीत अव्वल 10 मानांकित खेळाडूंपैकी सहा जण स्पर्धेबाहेर गेले आहेत.
हा विजय अविश्वसनीय आहे. मागील काही सामन्यात मी आक्रमक खेळल्याने हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया सामन्यानंतर गुइडो पेला याने दिली.