न्यूयॉर्क - जागतिक क्रमवारीत 67 व्या स्थानावर असलेली अमेरिकेची महिला टेनिसपटू व्हीनस विल्यम्सला टेनिसपासून दूर जायचे नाही. सध्या तिचे लक्ष फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपनकडे लागले आहे. 39 वर्षीय व्हीनसने तिच्या कारकीर्दीत आतापर्यंत दोन वेळा विम्बल्डन आणि यूएस ओपनची विजेतेपदे जिंकली आहे.
असे असले तरी तिला फ्रेंच ओपन व ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये यश मिळवता आलेले नाही. व्हीनस म्हणाली, "तुमच्याकडे नेहमीच तुमची स्वप्ने असतात. मला रोलंड गॅरोस जिंकण्याची इच्छा आहे. मी यापासून फारशी दूर नव्हती. ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही तीच गोष्ट आहे. मी थोडेशी दुर्दैवी होते. मी या विजेतेपदाला नेहमी मिस करते.''
सेरेना विल्यम्सची बहीण व्हीनसने 12 वर्षांपूर्वी एकेरीचे विजेतेपद जिंकले होते. पण तिला अजूनही खेळावर खूप प्रेम आहे. ती म्हणाला, "मी पूर्वी जेवढी खेळले तेवढी मी आता खेळत नाही. मला अजून अधिकाधिक पदके जिंकणे आवडते. माझ्याकडे खूप चांगला काळ आहे. मी अव्वल स्थानी राहिले आहे. पण मी खालीसुद्धा गेली आहे. एकंदरीत, मी हे सर्व केले आहे आणि मी त्यात आनंदी आहे."