न्यूयॉर्क - सर्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविच यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या माटेओ बेरेटिनी याचा पराभव केला. पिछाडीनंतर जोकोविचने शानदार पुनरागमन करत इटलीच्या खेळाडूचा 5-7, 6-2, 6-2, 6-3 अशा फरकाने पराभव केला.
नोवाक जोकोविचची शानदार वापसी -
नोवाक जोकोविचचा ग्रँडस्लॅममध्ये आत्तापर्यंत उपांत्यपूर्व फेरीत पराभव झालेला नाही. माटेओ बेरेटिनी याने यूएस ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पहिला सेट 7-5 अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने ताकतीने फटके मारले. याचा सामना बेरेटिनी याला करता आला नाही. परिणामी जोकोविचने दुसरा सेट 6-2 अशा फरकाने जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये बेरेटिनी याने वापसी करण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी जोकोविचने त्याचे मनसुबे हाणून पाडले. पुढील दोन्ही सेट 6-2, 6-3 अशा फरकाने जिंकत त्याने 12व्यांदा यूएस ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवशी गाठ
उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव याच्याशी होणार आहे. दरम्यान, ग्रँडस्लॅममध्ये जोकोविचचा हा सलग 26वा विजय आहे. त्याने यावर्षी ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली आहे.
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कोणाला मिळाली संधी
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीकडे मोठी जबाबदारी, BCCI ची घोषणा