न्यूयॉर्क - भारताचा अनुभवी टेनिस खेळाडू रोहन बोपण्णा आणि क्रोएशियाचा त्याचा जोडीदार इवान डोडिग यांचा यूएस ओपन स्पर्धेच्या पुरूष दुहेरी गटातील तिसऱ्या फेरीत पराभव झाला. सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात राजीव राम आणि जो सालिसबरी या चौथ्या मानांकित जोडीने त्याचा पराभव केला.
रोहन बोपण्णा आणि इवान डोडिग या 13व्या मानांकित जोडीला ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या उपविजेता जोडीकडून दोन तास 30 मिनिटे रंगलेल्या सामन्यात 7-6, 4-6, 6-7 अशा फरकाने पराभव पत्कारावा लागला. या पराभवासह भारताचे यूएस ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
सानिया मिर्झाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात
सानिया मिर्झाचे महिला दुहेरीत आणि मिश्र दुहेरीत पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले. याशिवाय भारताची युवा महिला टेनिसपटू अंकिता रैनाला देखील महिला दुहेरीत पराभव पत्कारावा लागाला. प्रजनेश गुणेश्वरन, सुमित नागल, आणि राजकुमार रामनाथन एकेरीच्या मुख्य ड्रॉ मध्ये जागा मिळवण्यात अपयशी ठरले. त्यांचा पात्रता फेरीतच पराभव झाला.
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेआधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, मिसबाह उल हकसह वकार युनूसचा राजीनामा
हेही वाचा - Ind vs Eng : भारताचा चौथ्या कसोटी सामन्यात 157 धावांनी विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी