ETV Bharat / sports

US Open 2021 : अलेक्झांडर ज्वेरेवचा धुव्वा उडवत नोवाक जोकोविच अंतिम फेरीत - फ्रेंच ओपन

यूएस ओपन स्पर्धेचा उपांत्य सामना नोवाक जोकोविच आणि अलेक्झांडर ज्वेरेव यांच्यात झाला. या सामन्यात जोकोविच याने बाजी मारली. जोकोविच या विजयासह अंतिम फेरीत पोहोचला आहे.

Novak Djokovic overcomes Zverev in five sets, to clash with Medvedev for title
US OPEN 2021 : अलेक्झांडर ज्वेरेवचा धुव्वा उडवत नोवाक जोकोव्हिच अंतिम फेरीत
author img

By

Published : Sep 11, 2021, 6:45 PM IST

Updated : Sep 14, 2021, 5:29 PM IST

न्यूयॉर्क - जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाचा नोवाक जोकोविच याला यूएस ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याला उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव याने चांगलेच झुंजवले. दोघातील सामना पाच सेटपर्यंत रंगला. यात जोकोविचने 4-6, 6-2, 6-4, 4-6, 6-2 अशा फरकाने बाजी मारली.

नोवाक जोकोविच एका खास विक्रमापासून एक पाऊल दूर आहे. तो जर ही स्पर्धा जिंकला तर एकाच वर्षात चार मोठ्या स्पर्धा जिंकणारा तो दुसरा खेळाडू ठरेल. याआधी 1969 मध्ये रोड लेवेर यांनी अशा कारनामा केला होता. त्याने यावर्षी ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेतील जोकोविचचा हा सलग 27वा विजय आहे.

यूएस ओपनचा अंतिम सामना नोवाक जोकोविच आणि दुसऱ्या मानांकित डेनिल मेदवेदेव याच्यात होणार आहे. जोकोविचने मेदवेदेवचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली तर त्याचे हे विक्रमी 21वे ग्रँडस्लॅम ठरेल.

अलेक्झांडर ज्वेरेवचा पराभव केल्यानंतर नोवाक जोकोविच म्हणाला की, खेळासाठी येथील वातावरण खूप चांगले आहे, यामुळे आभार मानतो. मी पुढील सामना माझ्या करियरमधील अखेरचा सामना आहे, असे समजून खेळेन.

दरम्यान, नोवाक जोकोविच याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या माटेओ बेरेटिनी याचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. या सामन्यात पिछाडीनंतर जोकोविचने शानदार पुनरागमन करत इटलीच्या खेळाडूचा 5-7, 6-2, 6-2, 6-3 अशा फरकाने पराभव केला होता.

हेही वाचा - ENG vs IND: पैसा आणि IPL मुळे मँचेस्टर कसोटी रद्द करण्यात आली, मायकल वॉनचा गंभीर आरोप

हेही वाचा - IPL 2021: खास चार्टर प्लेनने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव अबुधाबीत दाखल

Last Updated : Sep 14, 2021, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.