न्यूयॉर्क - वर्षाअखेरीची ग्रँडस्लॅम स्पर्धा अशी ओळख असलेल्या यूएस ओपनला तब्बल सहा वर्षांनंतर नवा विजेता मिळाला. ऑस्ट्रीयाच्या डॉमिनिक थीमने विजेतेपद पटकावले. त्याने संघर्षपूर्ण ठरलेल्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला. थीमने हा सामना २-६, ४-६, ६-४, ६-३, ७-६ (६) असा जिंकत पहिल्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातली.
-
It's Dominic Thiem's moment.
— US Open Tennis (@usopen) September 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The point that made him a Grand Slam champion 👇 pic.twitter.com/uYMplH3TF7
">It's Dominic Thiem's moment.
— US Open Tennis (@usopen) September 14, 2020
The point that made him a Grand Slam champion 👇 pic.twitter.com/uYMplH3TF7It's Dominic Thiem's moment.
— US Open Tennis (@usopen) September 14, 2020
The point that made him a Grand Slam champion 👇 pic.twitter.com/uYMplH3TF7
यूएस ओपन स्पर्धेचा अंतिम सामना रोमांचक ठरला. पहिला सेट जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने २-६ अशा फरकाने जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसरा सेटमध्ये देखील अलेक्झांडर अग्रेसर ठरला. त्याने दुसरा सेटही ४-६ अशा फरकाने जिंकला. पहिल्यांदाच यूएस ओपनची अंतिम फेरी गाठणारा अलेक्झांडर विजेता ठरणार, असे वाटत असताना, तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही ग्रँडस्लॅम उंचावण्याचे स्वप्न अधुरे राहिलेला थीमने तिसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले. त्याने तिसरा सेट ६-४ च्या फरकाने जिंकला.
चौथ्या सेटमध्ये देखील थीमने हा धडाका कायम ठेवला. त्याने चौथा सेट ६-३ असा जिंकत सामना बरोबरीत आणला. अखेरच्या निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सर्वस्व पणाला लावले. हा सेट ट्रायब्रेकरमध्ये गेला. तेव्हा थीमने अखेरच्या क्षणी कामगिरी उंचावत हा सेट जिंकत विजेतेपदावर नाव कोरले.
दरम्यान, कोरोनामुळे अमेरिकेत प्रवास करण्यास नकार देणारा राफेल नदाल आणि दुखापतीमुळे वर्षभर टेनिसपासून दूर राहणारा रॉजर फेडरर यांच्या अनुपस्थितीत नोव्हाक जोकोव्हिच अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजला जात होते. पण जोकोव्हिचची अनपेक्षित हकालपट्टी झाल्यामुळे सहा वर्षांनंतर अमेरिकन स्पर्धेला डॉमिनिक थीमच्या रुपाने नवा विजेता मिळाला आहे.
हेही वाचा - US Open २०२० : नाओमी ओसाकाने जिंकली यूएस ओपन, व्हिक्टोरियाला चारली धूळ