ETV Bharat / sports

Us Open २०१९ : सेरेना विल्यम्स नाबाद @१०० - यूएस ओपन २०१९

युएस ओपन २०१९ मध्ये उपांत्यपुर्व सामना सेरेना विल्यम्स आणि चीनच्या वांग कियांग यांच्यात रंगला होता. हा सामना सेरेनाने अवघ्या ४४ मिनिटात ६-१, ६-० असा सरळ सेटमध्ये जिंकला.

Us Open २०१९ : सेरेना विल्यम्स नाबाद '१००'
author img

By

Published : Sep 4, 2019, 9:58 PM IST

न्यूयॉर्क - दिग्गज महिला टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्सने यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिने उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या वांग कियांग हिचा पराभव केला. सेरेनाचा हा ग्रँडस्लॅममधील १०० वा विजय आहे.

युएस ओपन २०१९ मध्ये उपांत्यपुर्व सामना सेरेना विल्यम्स आणि चीनच्या वांग कियांग यांच्यात रंगला होता. हा सामना सेरेनाने अवघ्या ४४ मिनिटात ६-१, ६-० असा सरळ सेटमध्ये जिंकला.

US OPEN : दुखापत होऊनही सेरेनाची यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

वांग हिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी विराजमान असलेल्या अॅश्ले बार्टी हिचा धक्कादायक पराभव करत स्पर्धेमध्ये उलटफेर केला होता. यामुळे सेरेना विरुध्दातील सामनाही रंगतदार होईल असे बोलले जात होते. मात्र, सेरेनाने हा सामना एकतर्फी जिंकला.

US OPEN : फेडररला पराभवाचा धक्का, 'या' खेळाडूने उपांत्यपूर्व फेरीत हरवले

दरम्यान, सेरेना विल्यम्स हिला याच स्पर्धेतील चौथ्या फेरीसाठी झालेल्या सामन्यात गंभीर दुखापत झाली होती. सामन्यात तिचा पाय मुरगळला होता. दुखापतग्रस्त असतानाही सेरेनाना हा सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.