ETV Bharat / sports

बियांका आंद्रेस्कू : हीच 'ती' जिने वयाच्या १९ व्या वर्षी जिंकले ग्रँडस्लॅम - सेरेना विल्यम्स

कॅनडाची १९ वर्षीय महिला टेनिसपटू बियांका आंद्रेस्कू हिने यूएस ओपन २०१९ ची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून इतिहास रचला. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच कॅनेडिअन खेळाडू ठरली. बियांकाने अंतिम सामन्यात २३ ग्रँडस्लॅम विजेती सेरेना विल्यम्स हिचा ६-३, ७-५ असा पराभव केला. या विजयाबरोबर बियांका सर्वात कमी वयात ग्रँडस्लॅम जिंकणारी दुसरी खेळाडू ठरली आहे.

बियांका आंद्रेस्कू : हीच 'ती' जिने वयाच्या १९ व्या वर्षी जिंकले ग्रँडस्लॅम
author img

By

Published : Sep 8, 2019, 6:29 PM IST

न्यूयॉर्क - कॅनडाची १९ वर्षीय महिला टेनिसपटू बियांका आंद्रेस्कू हिने यूएस ओपन २०१९ ची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून इतिहास रचला. अशी कामगिरी करणारी ती पहिलाच कॅनेडिअन खेळाडू ठरली. बियांकाने अंतिम सामन्यात २३ ग्रँडस्लॅम विजेती सेरेना विल्यम्स हिचा ६-३, ७-५ असा पराभव केला. या विजयाबरोबर बियांका सर्वात कमी वयात ग्रँडस्लॅम जिंकणारी दुसरी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी २००६ मध्ये रशियाची मारिया शारापोव्हा हिने ग्रँडस्लॅम जिंकले होते.

यूएस ओपनसाठी बियांका २ वेळा ठरली अपात्र -

यंदाच्या यूएस ओपन विजेती ठरलेली बियांका मागील दोन वर्ष यूएस ओपन स्पर्धेसाठी पात्र ठरलेली नव्हती. ती पात्रता फेरीतील पहिल्या राऊंडमधून बाहेर पडली होती.

पहिल्या जेतेपदावेळी 'तिचा' जन्मही झाला नव्हता, तिनं आज सेरेनाला चारली धूळ!

बियांकाचा जन्म झाला नव्हता तेव्हा सेरेनाने जिंकले ग्रँडस्लॅम -

सेरेना विल्यम्स हिने १९९९ मध्ये यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती. यावेळी बियांका हिचा जन्मही झालेला नव्हता. सेरेनाने ६ वेळा ही स्पर्धा जिकंली आहे तर बियांका ही पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

US OPEN : राफेल नदाल फायनलमध्ये, १९ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाकडे कूच

बियांका हिचे आई-वडिल हे मूळचे रोमानियाचे असून ते कॅनडाला स्थायिक झाले आहेत. या स्थलांतराच्या वेळी बियंका ११ वर्षाची होती.

Intro:Body:

sports news in marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.