मेलबर्न - वर्षाच्या सुरुवातीची ग्रँडस्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दाखल झालेल्या दोन खेळाडूंना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या खेळाडूंविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कोरोनाच्या ९ प्रकरणांमुळे स्पर्धेसाठी आलेले ७२ खेळाडू क्वारंटाइन आहेत.
हेही वाचा - थायलंड ओपन २०२१ : सिंधूची विजयी सलामी
टेनिस ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने या ७२ खेळाडूंची यादी देण्यास नकार दिला आहे. मात्र, अनेकांनी सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे त्यांच्या स्थानाविषयी माहिती दिली आहे. पुढील महिन्यात ८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी १२०० हून अधिक लोक दाखल झाले आहे. यात खेळाडू आणि प्रशिक्षकांव्यतिरिक्त अधिकारी व माध्यमांती व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व १७ चार्टर्ड विमानाने येथे आले आहेत.