ETV Bharat / sports

“लोकं भूकेने मरत आहेत, तर काहीजण व्हिडिओ पोस्ट करत आहेत”

स्वयंपाक आणि खाण्याचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करणार्‍या सेलिब्रिटींना टेनिसस्टार सानिया मिर्झाने धारेवर धरले आहे. तिने ट्विटररद्वारे या लोंकावर टीका केली.

Tennisstar sania mirza slams those who sharing post of slams and cooking
“लोकं भूकेने मरत आहेत, तर काहीजण व्हिडिओ पोस्ट करत आहेत”
author img

By

Published : Apr 4, 2020, 8:17 PM IST

नवी दिल्ली - लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियावर स्वयंपाक आणि खाण्याचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करणार्‍या सेलिब्रिटींना टेनिसस्टार सानिया मिर्झाने धारेवर धरले आहे. तिने ट्विटररद्वारे या लोकांवर टीका केली. "स्वयंपाकाचा व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून अद्याप आपले मन भरलेले नाही का? असा सवाल सानियाने ट्विटरवर केला आहे.

या प्रश्नासोबत सानियाने भूकेने व्याकूळ असणाऱ्यांसाठी आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “फक्त इतकेच सांगायचे आहे की या जगात शेकडो, हजारो लोक आहेत. जे उपासमारीने मरत आहेत आणि दिवसभर खाण्यासाठी धडपडत आहेत.”

कोरोना व्हायरसमुळे भारतात २१ दिवसांचा लॉकडाउन आहे. टाळेबंदीमुळे खाण्यापिण्यास भाग पाडणार्‍या मजुरांसाठी आणि गरजूंसाठी सानियाने सव्वा कोटी उभे केले आहेत. सानियाच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. एका चाहत्याने तिला, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तु आपले प्रयत्न सुरू ठेव, असे म्हटलं आहे. तर सानियाचे सासर पाकिस्तानमधूनही तिचे कौतूक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.