नवी दिल्ली - ग्रिन कोर्टचा बादशहा आणि टेनिसचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळख असलेला स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर तब्बल ३ वर्षांनंतर क्ले कोर्टवर उतरणार आहे. 20 ग्रँडस्लॅम विजेता असलेला फेडरर आगामी माद्रिद ओपन स्पर्धेत क्ले कोर्टवर खेळताना दिसणार आहे.
आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्यात असलेल्या ३७ वर्षीय रॉजर फेडररने क्ले कोर्टवर शेवटचा सामना २०१६ मध्ये रोम मास्टर्समध्ये खेळला होता. त्यानंतर तो सतत ग्रिन कोर्ट आणि हार्ड कोर्टवर खेळत आहे.
१०१ टेनिस टायटल्स विजेता असलेला फेडरर माद्रिद ओपन स्पर्धेबाबत बोलताना म्हणाला की, 'मी या स्पर्धेत क्ले कोर्टवर खेळण्यास खुप उत्सुक असून, माझ्यासाठी हे एक चांगले आव्हान असेल. यासाठी मला पहिल्यापासून तयारी करावी लागणार आहे.'