स्पेन (माद्रीद) - रोमानियाची महिला टेनिस खेळाडू सिमोना हालेपने माद्रीद ओपन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. हालेपने गुरुवारी मानोलो सांटाना कोर्टवर महिला एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अशली बार्टीला ७-५, ७-५ ने सरळ सेटमध्ये नमवत सेमीफायनल गाठली.
जागतिक महिला क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या हालेपचा सेमीफायनध्ये सामना स्वित्झर्लंडच्या बेलिंदा बेनकिक हिच्यासोबत होणार आहे. बेलिंदाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाला ६-३, ६-२,७-५ ने पराभवाचा मोठा धक्का देत सेमीफायनल गाठली. या पराभवामुळे नाओमीचे माद्रीद ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे.