लंडन - विम्बल्डन स्पर्धेच्या महिला गटातील अंतिम सामन्यात सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का बसला आहे. रोमानियाच्या सिमोना हालेपने सेरेनाचा ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये एकतर्फी पराभव केला.
अंतिम सामन्यात हालेपने सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला. तिने पहिल्या सेटमध्ये ४-० एकतर्फी आघाडी घेतली. तेव्हा सेरेनाने सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र हालेपच्या आक्रमणासमोर सेरेनाचा निभाव लागला नाही. तिने पहिला सेट ६-२ असा फरकाने गमावला.
त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही हालेपने आक्रमण सुरूच ठेवत एकतर्फी सामन्यात बाजी मारली. हालेपने हा सामना फक्त ५५ मिनिटात जिंकला.
हालेपने यापूर्वी २०१८ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. आता त्यानंतर तिने पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा जिंकली. तसेच तिने सेरेनाला २४ वा ग्रॅन्डस्लॅम जिंकण्याच्या स्वप्नाला धक्का दिला आहे.