पॅरिस - अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने दुखापतीमुळे बुधवारी फ्रेंच ओपनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. सेरेना विल्यम्सने क्रिस्टी ऑनला सरळ सेटमध्ये पराभूत करून महिला एकेरीच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला होता.
-
Serena Williams has withdrawn from #RolandGarros with an achilles injury. pic.twitter.com/u6vGa9JCkX
— Roland-Garros (@rolandgarros) September 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Serena Williams has withdrawn from #RolandGarros with an achilles injury. pic.twitter.com/u6vGa9JCkX
— Roland-Garros (@rolandgarros) September 30, 2020Serena Williams has withdrawn from #RolandGarros with an achilles injury. pic.twitter.com/u6vGa9JCkX
— Roland-Garros (@rolandgarros) September 30, 2020
सहाव्या मानांकित सेरेनाने क्रिस्टीचा ७-६, ६-० असा पराभव केला. सेरेना या सामन्यासाठी ४०-० अशा आघाडीने सर्व्हिस करत होती. पण, क्रिस्टीने तीन मॅच पॉइंटचा बचाव केला. सेरेनाने चौथा मॅच पॉइंट जिंकला, मात्र, तिची सर्व्हिस पुन्हा चुकली. सेरेनाने ब्रेक पॉइंट वाचवला. त्यानंतर क्रिस्टीला तिने स्पर्धेबाहेर ढकलले.
फ्रेंच ओपन ही स्पर्धा ११ ऑक्टोबरपर्यंत रंगणार आहे. या स्पर्धेची सुरूवात १९८१मध्ये फ्रेंच क्ले कोर्ट चॅम्पियनशीप या नावाने करण्यात आली होती. लाल मातीवरील 'बादशाह' अशी ओळख असलेल्या स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने तब्बल १२ वेळ ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत नदालला अग्रमानांकित सर्बियाचा खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचचे मोठे आव्हान असणार आहे. याशिवाय या दोघांना गेल्या दोन फ्रेंच स्पर्धामध्ये उपविजेतेपद मिळवणारा ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम याचे कडवे आव्हान आहे.