बाओटू (चीन) - भारताचा युवा खेळाडू शशी कुमार मुकुंदने आपल्या कारकिर्दीतील चांगली कामगिरी केली आहे. चीनच्या बाओटू चॅलेंजर स्पर्धेमध्ये त्याने एकेरी आणि दुहेरी स्पर्धेत उपविजेतेपद राखले आहे.
हेही वाचा - जे कोणत्याही भारतीयाला जमले नाही ते मलिंगाने करुन दाखवले
या स्पर्धेच्या एकेरीमध्ये १२ व्या सीडेड मुकुंदला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थने पराभवाचा धक्का दिला. ४-६, ३-६ असे मुकुंदला पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेपूर्वी, चेन्नई ओपन स्पर्धेमध्ये मुकुंदने उपांत्यफेरीत धडक मारत वैयक्तिक सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले होते.
या स्पर्धेच्या दुहेरीतही मुकुंदला अंतिम फेरीत पराभव स्विकारावा लागला. रूसच्या तेयूमुराज गाबाश्विली सोबत खेळताना त्यांना कोरियाच्या जि सुंग नाम आणि मिन क्यू सोंग यांनी हरवले. या जोडीने त्यांच्यावर ७-६, ६-२ अशी मात केली. मुकुंदला एकेरीच्या उपविजेतेपदाचे बक्षीस म्हणून ४२४० डॉलर्स मिळाले तर दुहेरीत त्यांना १८०० डॉलर्स मिळाले.