कोकेल्सचेउर - भारताची अनुभवी महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची चीनी जोडीदार शुआई झांग या जोडीने लक्झमबर्ग ओपन स्पर्धेत चांगली कामगिरी केली. या जोडीने महिला दुहेरी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
सानिया मिर्झा आणि शुआई झांग जोडीने राउंड ऑफ 16 च्या सामन्यात जर्मनीच्या तायसिया मोर्डरगर आणि याना मोर्डरगर या जोडीचा पराभव केला. मिर्झा-झांग जोडीने हा सामना 6-2, 6-3 अशा फरकाने जिंकला.
सानिया मिर्झा सहा वेळची ग्रँडस्लॅम दुहेरीची चॅम्पियन आहे. तर शुआई झांग हिने ऑस्ट्रेलियाची सामंथा स्टोसुर हिच्यासोबत मिळून 2021 यूएस ओपन स्पर्धेत आपलं दुसरे ग्रँडस्लॅम जिंकले आहे.
भारत-चीनी जोडीला लक्झमबर्ग ओपन स्पर्धेत दुसरे मानांकन मिळाले आहे. सानिना मिर्झा-शुआई झांग जोडीसमोर उपांत्यपूर्व फेरीत ग्रीट मिनन आणि एलिसन वान उयतवांक या बेल्जियमच्या जोडीचे आव्हान असणार आहे.
हेही वाचा - भारतीय टेनिसपटूंची पाकिस्तानमध्ये शाही बडदास्त, शाकाहारी जेवणापासून मिळत आहेत 'या' खास सुविधा
हेही वाचा - US Open Final : रागात तोडलं रॅकेट; पराभव समोर पाहून ओक्साबोक्सी रडू लागला नोवाक जोकोविच