ETV Bharat / sports

सिमोना हालेप यंदाच्या यूएस ओपनमधून बाहेर - simona halep and us open 2020

हालेपने ट्विटरवर म्हटले, "कोरोनाव्हायरसमुळे होणारी जागतिक परिस्थिती लक्षात घेता मी यूएस ओपनसाठी न्यूयॉर्कला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझे आरोग्य माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे, असे मी नेहमीच म्हणाले आहे. मी युरोपमध्येच राहीन. प्रशिक्षण घेईन. मला माहित आहे, की युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशन आणि डब्ल्यूटीए महिला टेनिस असोसिएशनने स्पर्धा सुरक्षित ठेवण्यासाठी खूप चांगले काम केले आहे. "

romanian tennis star simona halep withdraws from us open 2020
सिमोना हालेप यंदाच्या यूएस ओपनमधून बाहेर
author img

By

Published : Aug 18, 2020, 10:32 AM IST

न्यूयॉर्क - विम्बल्डन चॅम्पियन सिमोना हालेप यंदाच्या यूएस ओपनचा भाग होणार नाही. कोरोनाच्या काळात आपण आपल्या आरोग्याला प्राधान्य देणार असून सध्या युरोपमध्ये राहणार असल्याचे हालेपने सांगितले.

हालेपने ट्विटरवर म्हटले, "कोरोनाव्हायरसमुळे होणारी जागतिक परिस्थिती लक्षात घेता मी यूएस ओपनसाठी न्यूयॉर्कला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझे आरोग्य माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे, असे मी नेहमीच म्हणाले आहे. मी युरोपमध्येच राहीन. प्रशिक्षण घेईन. मला माहित आहे, की युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशन आणि डब्ल्यूटीए महिला टेनिस असोसिएशनने स्पर्धा सुरक्षित ठेवण्यासाठी खूप चांगले काम केले आहे. "

हालेप पुढे म्हणाली, "सर्व बाबींचा आणि आपण ज्या परिस्थितीला सामोरे जात आहोत, त्याचा विचार केल्यानंतर मी ठरवले, की मी यूएस ओपन खेळण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार नाही."

  • 1/2

    After weighing up all the factors involved and with the exceptional circumstances in which we are living, I have decided that I will not travel to New York to play the @usopen

    I always said I would put my health at the heart of my decision

    — Simona Halep (@Simona_Halep) August 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

डब्ल्यूटीए क्रमवारीतील पहिल्या आठमधील सहा खेळाडू यंदाच्या यूएस ओपनमध्ये भाग घेणार नाहीत. अव्वल क्रमांकाची खेळाडू एश्ले बार्टी आणि गतविजेती बियान्का अँड्रेस्कू या स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत. पुरुषांमध्ये राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर ही स्पर्धा खेळणार नाही.

अव्वल मानांकित रोमानियाची टेनिसपटू सिमोना हालेपने नुकतेच प्राग ओपनचे विजेतेपद जिंकले. हालेपने अंतिम सामन्यात एलिस मरंटेसला ६-२, ७-५ असे सरळ सेटमध्ये नमवले. हा सामना एक तास ३३ मिनिटे रंगला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.