ETV Bharat / sports

रॉजर्स कप : सेरेना संघर्ष करत तर नदाल एकही चेंडूला स्पर्श न करता अंतिम फेरीत - राफेल नदाल अंतिम फेरीत

दिग्गज टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्स आणि राफेल नदाल याने रॉजर्स कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. अमेरिकेची अव्वल महिला खेळाडू सेरेना हिने उपांत्य फेरीत चेक गणराज्यच्या मारी बाउजकोवा हिचा १-६, ६-३, ६-३ असा पराभव केला. तर पुरुष गटामध्ये उपांत्य फेरीत फ्रान्सचा गेइल मॉनफिल्स याने दुखापतीमुळे सामन्यापूर्वीच माघार घेतली. यामुळे नदाल एकही चेंडू न परतवता अंतिम फेरीत पोहोचला आहे.

रॉजर्स कप : सेरेना संघर्ष करत तर नदाल एकही चेंडूला स्पर्श न करता अंतिम फेरीत
author img

By

Published : Aug 11, 2019, 1:09 PM IST

कॅनडा - दिग्गज टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्स आणि राफेल नदाल याने रॉजर्स कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. अमेरिकेची अव्वल महिला खेळाडू सेरेना हिने उपांत्य फेरीत चेक गणराज्यच्या मारी बाउजकोवा हिचा १-६, ६-३, ६-३ असा पराभव केला. तर पुरुष गटामध्ये उपांत्य फेरीत फ्रान्सचा गेइल मॉनफिल्स याने दुखापतीमुळे सामन्यापूर्वीच माघार घेतली. यामुळे नदाल एकही चेंडू न परतवता अंतिम फेरीत पोहोचला आहे.

सेरेना विल्यम्सने उपांत्य सामन्यात पहिला सेट १-६ ने गमावला. त्यानंतर तिने सामन्यात दमदार वापसी करत पुढील दोन्ही सेट ६-३, ६-३ असा फरकाने जिंकले. सेरेनाचा अंतिम सामना बिआन्का एंड्रेस्कू हिच्याशी होणार आहे. रॉजर्स कप स्पर्धेच्या इतिहासात सेरेनाचा एकदाच पराभव झाला आहे. ती २००० साली मार्टिंना हिंगीसकडून पराभूत झाली होती.

फ्रान्सचा गेल मोनफिल्स याने दुखापत झाल्याने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून माघार घेतली. यामुळे राफेल नदाल अंतिम फेरीत पोहोचला आहे. नदालचा अंतिम सामना रशियाच्या डेनिल मेदवेदेव्ह याच्याशी होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.