मियामी - टेनिसविश्वातील दिग्गज खेळाडू रॉजर फेडररने रविवारी मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या जॉन इस्नेरला ६-१, ६-४ ने पराभूत करत किताब आपल्या नावे केला आहे. फेडररचा हा कारकिर्दितील १०१ वा किताब ठरला आहे. तसेच फेडररचा हा चौथा मियामी ओपनचा किताब ठरला, यापूर्वी त्याने २०१७ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
From one #MiamiOpen champion to another: RESPECT 👊@JohnIsner @RogerFederer 👍
— ATP Tour (@ATP_Tour) April 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">From one #MiamiOpen champion to another: RESPECT 👊@JohnIsner @RogerFederer 👍
— ATP Tour (@ATP_Tour) April 1, 2019From one #MiamiOpen champion to another: RESPECT 👊@JohnIsner @RogerFederer 👍
— ATP Tour (@ATP_Tour) April 1, 2019
सर्वाधिक टेनिस टायटल्स मिळवणाऱ्यांच्या यादित फेडरर सध्या दुसऱया क्रमांकावर आहे. फेडररपेक्षा जास्त टायटल्स ही फक्त महान खेळाडू जिमी कोनर्स यांनी जिंकली आहेत. त्याच्या नावावर १०९ टायटल्सआहेत. तर फेडररच्या नावावर सध्या १०१ टायटल्स आहेत.
This one’s for you, Miami. @rogerfederer | #miamiopen pic.twitter.com/fSmCNXIK4G
— Miami Open (@MiamiOpen) March 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This one’s for you, Miami. @rogerfederer | #miamiopen pic.twitter.com/fSmCNXIK4G
— Miami Open (@MiamiOpen) March 31, 2019This one’s for you, Miami. @rogerfederer | #miamiopen pic.twitter.com/fSmCNXIK4G
— Miami Open (@MiamiOpen) March 31, 2019
मियामी ओपन जिंकताच रॉजर फेडररने टेनिसच्या जागतिक क्रमवारीत एका स्थानाची सुधारणा करत चौथे स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने आपवे अव्वल स्थान कायम राखले आहे. नोव्हाकला मियामी ओपनमध्ये स्पेनच्या रॉबेर्टो अगुटने पराभवाचा धक्का देत मोठा उलटफेर केला होता.