बासेल - टेनिसच्या महानायक असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने सध्या सुरु असलेल्या बासेल एटीपी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक दिली. उपांत्य सामन्यात त्याने स्टीफॅनोस सिटसिपासला ६-४, ६-४ ने हरवत यंदाच्या हंगामातील ५० वा विजय साजरा केला.
-
Roger's 50th win of the season! @rogerfederer moves past @StefTsitsipas 6-4 6-4 to reach the #SwissIndoorsBasel final 👏
— ATP Tour (@atptour) October 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🎥: @TennisTV pic.twitter.com/I9Y4RdkyDc
">Roger's 50th win of the season! @rogerfederer moves past @StefTsitsipas 6-4 6-4 to reach the #SwissIndoorsBasel final 👏
— ATP Tour (@atptour) October 26, 2019
🎥: @TennisTV pic.twitter.com/I9Y4RdkyDcRoger's 50th win of the season! @rogerfederer moves past @StefTsitsipas 6-4 6-4 to reach the #SwissIndoorsBasel final 👏
— ATP Tour (@atptour) October 26, 2019
🎥: @TennisTV pic.twitter.com/I9Y4RdkyDc
हेही वाचा - बांगलादेशच्या 'या' अनुभवी खेळाडूने घेतली भारत दौऱ्यातून माघार
यंदाच्या हंगामात सिटसिपास आणि फेडरर चार वेळा आमने सामने आले होते. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिटसिपासने ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये फेडररचा पराभव केला होता. ३८ वर्षीय फेडररने नऊ वेळा बासेल एटीपी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
नुकत्याच झालेल्या शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या युवा टेनिसपटू अॅलेक्झँडर ज्वेरेवने त्याला ६-३, ६-७ (७), ६-३ ने मात दिली होती