नवी दिल्ली - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदालने मेक्सिको ओपनचे जेतेपद पटकावले. यंदाच्या वर्षातील नदालचे हे पहिले विजेतेपद आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जला पछाडले.
-
There it is 🙌
— ATP Tour (@atptour) March 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A 🏆 & 🤠 for @RafaelNadal. #AMT2020
🎥: @TennisTV pic.twitter.com/UFuhwgjVFH
">There it is 🙌
— ATP Tour (@atptour) March 1, 2020
A 🏆 & 🤠 for @RafaelNadal. #AMT2020
🎥: @TennisTV pic.twitter.com/UFuhwgjVFHThere it is 🙌
— ATP Tour (@atptour) March 1, 2020
A 🏆 & 🤠 for @RafaelNadal. #AMT2020
🎥: @TennisTV pic.twitter.com/UFuhwgjVFH
हेही वाचा - Women t20 WC : पाकिस्तानला धक्का देत आफ्रिका उपांत्य फेरीत दाखल
अनुभवी नदालने फ्रिट्जला ६-३, ६-२ अशी मात देत मेक्सिको ओपनचे विजेतेपद तिसऱ्यांदा पटकावले आहे. यापूर्वी, त्याने २०१३ आणि २०१५ मध्ये हा किताब जिंकला होता. नदालच्या कारकिर्दीतील हे ८५ वे विजेतेपद आहे. ३३ वर्षीय नदालला यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
-
Reunited and it feels so good 💕@RafaelNadal | @AbiertoTelcel pic.twitter.com/uqf7f0tWT8
— ATP Tour (@atptour) March 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Reunited and it feels so good 💕@RafaelNadal | @AbiertoTelcel pic.twitter.com/uqf7f0tWT8
— ATP Tour (@atptour) March 1, 2020Reunited and it feels so good 💕@RafaelNadal | @AbiertoTelcel pic.twitter.com/uqf7f0tWT8
— ATP Tour (@atptour) March 1, 2020
यंदाच्या मेक्सिको ओपन स्पर्धेत नदालने एकही सेट गमावला नाही. त्याला या स्पर्धेत एकूण १९ विजय मिळाले असून दोन वेळा त्याला मात खावी लागली आहे.