ETV Bharat / sports

रॉजर्स कप : नदाल, सेरेना उपांत्य फेरीत; नाओमीचा सेरेनाने केला पराभव - सेरेना विल्यम्स उपांत्य फेरीत बातमी

जागतिक टेनिस पुरुष गटात दोन नंबरवर असलेला स्पेनचा खेळाडू राफेल नदालने रॉजर्स कप स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात इटलीच्या फॅबिओ फॉग्नीनी याचा २-६, ६-१, ६-२ असा पराभव केला. तर महिला गटात अमेरिकेची आघाडीची खेळाडू सेरेना विल्यम्सने उपांत्य फेरी गाठली. तिने जागतिक क्रमवारीत २ नंबरवर असलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिचा ६-३, ६-४ असा पराभव केला.

रॉजर्स कप : नदाल, सेरेना उपांत्य फेरीत; नाओमीचा सेरेनाने केला पराभव
author img

By

Published : Aug 10, 2019, 12:15 PM IST

कॅनडा - जागतिक टेनिस पुरुष गटात दोन नंबरवर असलेला स्पेनचा खेळाडू राफेल नदालने रॉजर्स कप स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात इटलीच्या फॅबिओ फॉग्नीनी याचा २-६, ६-१, ६-२ असा पराभव केला.

सामन्यानंतर बोलताना नदाल म्हणाला, 'हा सामना माझ्यासाठी आव्हानात्मक ठरला. यातून मला खूप काही शिकायला मिळाले. मी या सामन्याबाबत सकारात्मक असून मी योग्य मार्गावर आहे'.

रॉजर्स कप स्पर्धेच्या महिला गटात अमेरिकेची आघाडीची खेळाडू सेरेना विल्यम्सने उपांत्य फेरी गाठली. तिने जागतिक क्रमवारीत २ नंबरवर असलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिचा ६-३, ६-४ असा पराभव केला.

यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात ओसाका हिने सेरेना हिचा ६-२, ६-४ असा पराभव केला होता. रॉजर्स कप स्पर्धेमध्ये मात्र, सेरेनाने ओसाका हिचा पराभव करत त्या सामन्याची परतफेड केली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.