मेलबर्न - प्रजनेश गुणेश्वरनच्या पराभवाने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. आज (मंगळवार) पहिल्या फेरीसाठी झालेल्या सामन्यात जपानच्या ततसुमा इटो याने गुणेश्वरनचा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत १२२ व्या स्थानी असलेला गुणेश्वरनसमोर १४५ व्या स्थानावर असलेल्या इटोचे आव्हान होते. मात्र, इटोने गुणेश्वरनला ६-४, ६-२, ७-५ अशी धूळ चारली. वाईल्ड कार्डने स्पर्धेत एंन्ट्री मिळवलेल्या एटोसमोर आता दुसऱ्या फेरीत दिग्गज नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान आहे.
गुणेश्वरन लकी यूजरच्या रुपाने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. महत्वाची बाब म्हणजे, गुणेश्वरन पाचव्यांदा या प्रकारातून, ग्रॅडस्लॅम स्पर्धेसाठी पात्र ठरला. मात्र, त्याला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आणि भारताचे आव्हान संपूष्टात आले.
या खेळाडूंमुळे गुणेश्वरनला मिळाली होती संधी -
ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ मधून ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉर आणि पोलंडच्या कामिल माजराक यांनी दुखापतीमुळे माघार घेतली. त्यानंतर चिलीच्या निकोलस जेरी डोपिंग चाचणी दोषी आढळला. हे तिघे स्पर्धेतून बाहेर गेल्याने, लकी यूझरच्या रुपाने गुणेश्वरनला ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती.
दरम्यान, गुणेश्वरन आणि इटो यांच्यातील सामना सोमवारी खेळवण्यात येणार होता. पण पावसामुळे सामन्याची वेळ बदलण्यात आली आणि आज हा सामना खेळवण्यात आला.