रोम - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेली जपानची स्टार महिला टेनिसपटू नाओमी ओसाका हिला इटालियन ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. तिचा अमेरिकेच्या जेसिका पेगुला हिने पराभव केला.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक क्रमवारीत ३१व्या स्थानी असलेल्या जेसिकाने इटालियन ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत ओसाकाचा ७-६ (७-२), ६-२ ने पराभव केला.
२३ वर्षीय ओसाकाचा पराभव करत जेसिकाने तिच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय साकारला. विशेष म्हणजे, ओसाकाला नुकतीच पार पडलेल्या माद्रिद ओपन स्पर्धेत देखील दुसऱ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता.
माद्रिद ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत झालेली, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली ऑस्ट्रेलियाची अश्ले बार्टीने कझाकिस्तानच्या यारोसलावा श्र्वेदोवा हिचा ६-४, ६-१ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.
हेही वाचा - जगातील अव्वल टेनिसपटू अश्ले बार्टीचा पराभव करत आर्यनाने पटकावले माद्रिद ओपनचे विजेतेपद
हेही वाचा - नदाल, फेडररची ATP Rankings मध्ये घसरण