ETV Bharat / sports

नोव्हाक जोकोव्हिच क्वार्टर फायनल न खेळताच सेमी फायनलमध्ये दाखल

पुढील फेरीत नोव्हाकचा सामना रॉजर फेडरर आणि डोमिनिक थीम यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

नोव्हाक जोकोव्हिच
author img

By

Published : May 10, 2019, 9:20 PM IST

स्पेन (माद्रीद) - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिचने शुक्रवारी माद्रीद ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. क्रोएशियाच्या मारिन सिलिचने स्पर्धेतून माघार घेतल्याने क्वार्टर फायनलचा सामना न खेळताच नोव्हाकला पुढील फेरीचे तिकीट मिळाले.

जेवणातून विषबाधा झाल्याने मारिन सिलिचने माद्रीद ओपन स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णयावर बोलताना मारिन म्हणाला की, 'काल रात्री जेवणातून विषबाधा झाल्याने मला खुप त्रास झाला होता. माद्रीद ओपनमध्ये माझे आव्हान अशा प्रकारे संपल्याने मी खूप निराश आहे. चाहत्यांनी मला दिलेल्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल सर्वाचे मनपूर्वक आभार.'

सेमीफायनलमध्ये नोव्हाकचा सामना स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर आणि ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीम यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

Intro:Body:

Sport

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.