लंडन - सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिच याने उपांत्य फेरीत रॉबेर्टो ब्युटिस्टा अगुट याला ६-२, ४-६, ६-३, ६-२ असे पराभूत करत विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे जोकोव्हिचला आता पाच वेळा विम्बल्डनचे जेतेपद मिळवण्याची संधी लाभणार आहे.
२३ व्या मानांकित रॉबेर्टो ब्युटिस्टाने पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले. मात्र विजयाचे सातत्य पुढील दोन सेटमध्ये राखता न आल्यामुळे ब्युटिस्टाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला.
-
Back to defend his crown…
— Wimbledon (@Wimbledon) July 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Reigning champion @DjokerNole advances to his sixth #Wimbledon final where he’ll bid to win a fifth title after beating Roberto Bautista Agut pic.twitter.com/OYtfSUC7Hv
">Back to defend his crown…
— Wimbledon (@Wimbledon) July 12, 2019
Reigning champion @DjokerNole advances to his sixth #Wimbledon final where he’ll bid to win a fifth title after beating Roberto Bautista Agut pic.twitter.com/OYtfSUC7HvBack to defend his crown…
— Wimbledon (@Wimbledon) July 12, 2019
Reigning champion @DjokerNole advances to his sixth #Wimbledon final where he’ll bid to win a fifth title after beating Roberto Bautista Agut pic.twitter.com/OYtfSUC7Hv
विम्बल्डनमध्ये आता राफेल नदाल किंवा रॉजर फेडरर यांच्यात उपांत्य फेरीचा सामना चालू आहे. त्यामुळे जोकोव्हिचला अंतिम सामन्यात दमदार लढत द्यावी लागणार आहे. राफेल नदाल आणि रॉजर फेडरर हे दोन्ही खेळाडू २००८ साली विम्बल्डनमध्ये समोरासमोर आले होते. तसेच हे दोघे याच वर्षीच्या फ्रेंच ओपनमध्ये भिडले होते. या सामन्यात स्पेनच्या नदालने बाजी मारली होती.