मेलबर्न - टेनिस विश्वातील दोन दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीत खेळताना उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तर, महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली ऐश्लिग बार्टी हिला देखील अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यात यश आले आहे.
हेही वाचा - दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटसह त्याच्या मुलीचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
सर्बियाचा स्टार टेनिसपटू जोकोविचने अर्जेंटिनाचा १४ वा मानांकित दिएगो श्वार्जमॅन याच्यावर ६-३, ६-४, ६-४ अशी मात केली. जोकिविच या स्पर्धेत ११ वेळा अव्वल आठ खेळाडूंमध्ये दाखल झाला आहे. जोकोविचला उपांत्यपूर्व सामन्यात मिलोस राओनिचचा सामना करावा लागेल. तर, स्वित्झर्लंडच्या ३८ वर्षीय फेडररने हंगेरीचा मार्टन फुकसोविक्सयाला ४-६, ६-१, ६-२, ६-२ असे पराभूत केले. फेडररने ५७ वेळा ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे.
महिला गटात ऑस्ट्रेलियाची अव्वल मानांकित बार्टीने अमेरिकेची १८ वी मानांकित एलिसन रिस्केहिच्यावर ६-३,१-६, ६-४ ने मात केली.