ETV Bharat / sports

इटालियन ओपन : जोकोविच आणि नदालची उपांत्यपूर्व फेरीत धडक

author img

By

Published : Sep 19, 2020, 4:15 PM IST

जोकोविचने फिलिप क्राजिनोविचला तर, दालने डुसान लोजोविचला हरवत इटालियन ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला गटात रोमानियाच्या सिमोना हालेपने युक्रेनच्या डायना यास्ट्रेम्स्काचा ७-५, ६-४ असा पराभव केला.

novak djokovic and rafael nadal in the quarter-finals of the italian open
इटालियन ओपन : जोकोविच आणि नदालची उपांत्यपूर्व फेरीत धडक

रोम - अव्वल मानांकित सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि स्पेनचा राफेल नदाल यांनी इटालियन ओपन पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जोकोविचने शुक्रवारी फिलिप क्राजिनोविचला ७-६ (७), ६-३ असे सरळ सेटमध्ये नमवत १४व्यांदा स्पर्धेच्या अंतिंम-८मध्ये प्रवेश नोंदवला.

या सामन्यानंतर, जोकोविच म्हणाला, "मी आतापर्यंत खेळलेला हा सर्वात मोठा सेट आहे. मला वाटते, की तुमचा सर्वात चांगला मित्र असलेल्या व्यक्तीविरुद्ध खेळणे कधीही सोपे नाही. पहिला सेट वेगळ्या प्रकारे खेळला जाऊ शकला असता. फिलिप कदाचित मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मागे होता आणि मी संधींचा फायदा घेतला."

दुसर्‍या अंतिम-१६ सामन्यात नऊ वेळा विजेत्या नदालने डुसान लोजोविचला ६-१, ६-३ अशी मात दिली. नदाल म्हणाला, "मला वाटते की मी चांगले टेनिस खेळलो आहे. साहजिकच सुधारणा सतत व्हायला हवी. मी स्वतः हून घडत नसलेल्या गोष्टींवर काम करेन. आजची संध्याकाळ आणि प्रतिस्पर्धी छान होता."

महिला गटात रोमानियाच्या सिमोना हालेपने युक्रेनच्या डायना यास्ट्रेम्स्काचा ७-५, ६-४ असा पराभव केला. द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने रशियाच्या एना ब्लिन्कोव्हाचा ६-४, ६-३ असा पराभव केला. स्पेनच्या गार्बिन मुगुरूझाने ग्रेट ब्रिटनच्या योहाना कोन्टाला ६-४, ६-१ असे हरवले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.