नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा स्टार टेनिसपटू निक किर्गीयोसला एका मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. सिनसिनाटी मास्टर्सच्या खुल्या टेनिस स्पर्धेत किर्गीयोसने रॅकेट तोडले होते. त्यामुळे किर्गीयोसवर ११३,००० डॉलर्सच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
विनाअनुमती मैदान सोडणे, खेळभावनेच्या उलट वागणे या गोष्टींबद्दल किर्गीयोसला हा दंड लागला आहे. शिवाय, या घटनेची पूर्ण चौकशी झाल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाईदेखील होऊ शकते.
-
Nick Kyrgios faked a toilet break so that he could go and smash two rackets to let out his frustrations 😂
— ODDSbible (@ODDSbible) August 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
pic.twitter.com/maCzj0lUHZ
">Nick Kyrgios faked a toilet break so that he could go and smash two rackets to let out his frustrations 😂
— ODDSbible (@ODDSbible) August 15, 2019
pic.twitter.com/maCzj0lUHZNick Kyrgios faked a toilet break so that he could go and smash two rackets to let out his frustrations 😂
— ODDSbible (@ODDSbible) August 15, 2019
pic.twitter.com/maCzj0lUHZ
सिनसिनाटी मास्टर्सच्या खुल्या टेनिस स्पर्धेत किर्गीयोसला पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचा दुसऱ्या फेरीतच पराभव झाला. या पराभवानंतर, किर्गीयोसने दोन रॅकेट्स तोडले. शिवाय, त्याने आपले बुट प्रेक्षकांमध्ये फेकले होते.
जागतिक क्रमवारीत २७ व्या स्थानी असलेल्या निक किर्गीयोसला रूसच्या कारेन खाचानोने धूळ चारली होती. त्याने किर्गीयोसचा ६-७, ७-६, ६-२ असा पराभव केला.