नवी दिल्ली - आगामी डेव्हिस कप स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे वेळापत्रक ठरले असून हे सामने नोव्हेंबरच्या शेवटी होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) याबाबत माहिती दिली आहे. यावर्षीच्या २९-३० नोव्हेंबर किंवा ३० नोव्हेंबर-१ डिसेंबरला हे सामने खेळवण्यात येऊ शकतात.
-
Seven days of world class tennis in November 🎾
— Davis Cup (@DavisCup) September 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Book your attendance at the @DavisCupFinals today ➡️ https://t.co/0lP8ECRY2m#DavisCupMadridFinals pic.twitter.com/Gpcy2YbZXa
">Seven days of world class tennis in November 🎾
— Davis Cup (@DavisCup) September 13, 2019
Book your attendance at the @DavisCupFinals today ➡️ https://t.co/0lP8ECRY2m#DavisCupMadridFinals pic.twitter.com/Gpcy2YbZXaSeven days of world class tennis in November 🎾
— Davis Cup (@DavisCup) September 13, 2019
Book your attendance at the @DavisCupFinals today ➡️ https://t.co/0lP8ECRY2m#DavisCupMadridFinals pic.twitter.com/Gpcy2YbZXa
हेही वाचा - अॅशेस मालिका - आर्चरच्या झंझावातापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची भंबेरी, कांगारुच्या सर्वबाद २२५ धावा
सामन्याचे वेळापत्रक ठरले असले तरी सामन्याचे ठिकाण अजून ठरलेले नाही. चार नोव्हेंबरला पार पडणाऱ्या बैठकीत सामन्याचे ठिकाण ठरवण्यात येईल. अखिल भारतीय टेनिस संघ (एआयटीए) चे महासचिव हिरनमॉय चॅटर्जी यांनी एका मीडियासंस्थेला सांगितले, 'आयटीएफने आम्हाला तारखांबाबत कळवले असून चार नोव्हेंबरला पार पडणाऱ्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर सामन्याने नियोजन करण्यात येईल.'
हेही वाचा - बॅडमिंटन : भारताच्या सौरभ वर्माची व्हिएतनाम ओपनच्या उपांत्य फेरीत धडक
पाकिस्तान येथे खेळाडू पाठवणार का? या प्रश्नावर चॅटर्जींनी, 'या प्रश्नावर आता उत्तर देणे योग्य नाही' असे म्हटले आहे. भारत या सामन्यांसाठी पाकिस्तानला रवाना होणार होता, मात्र कलम ३७० च्या मुद्दयामुळे हा विषय बाजुला राहिला. हा सामना आधी १४-१५ सप्टेंबरला होणार होता, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव डेव्हिस कप समितीने हे सामने नोव्हेंबरपर्यंत स्थगित केले.