नूर सुलतान (कझाकिस्तान) - पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध सुरू असलेल्या डेव्हिस चषक स्पर्धेतील आशिया- ओसनिया ग्रुपच्या पहिल्या फेरीत भारताने ३-० ने आघाडी घेतली आहे. शनिवारी पार पडलेल्या सामन्यात जीवन नेदुनचेझियान आणि लिएंडर पेस यांनी अब्दुल रहमान आणि शोएब मोहम्मद यांच्या जोडीला ६-१, ६-३ ने हरवले. हा सामना ५३ मिनिटे रंगला होता.
-
#DavisCup: Paes, Jeevan win doubles as India secure tie against Pakistan | https://t.co/vjBxNUg3c5
— Onmanorama (@Onmanorama) November 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#DavisCup: Paes, Jeevan win doubles as India secure tie against Pakistan | https://t.co/vjBxNUg3c5
— Onmanorama (@Onmanorama) November 30, 2019#DavisCup: Paes, Jeevan win doubles as India secure tie against Pakistan | https://t.co/vjBxNUg3c5
— Onmanorama (@Onmanorama) November 30, 2019
हेही वाचा - रोहित शर्मा नव्हे तर 'सुपर' रोहित शर्मा...'हिटमॅन'चा भाव वधारला
तत्पूर्वी, रामकुमार रामनाथन आणि सुमित नागलने भारताला विजयी सुरूवात करून दिली होती. रामकुमारने ४२ मिनिटे रंगलेल्या या सामन्यामध्ये १७ वर्षीय मोहम्मद शोएबला ६-०, ६-० ने मात दिली. तर, सुमितने हुफैजा मोहम्मद रहमानला ६-०, ६-२ ने मात देत भारताला आघाडी मिळवून दिली.
या सामन्यातील विजेता संघ विश्व ग्रुप पात्रता स्पर्धेसाठी क्रोएशिया येथे जाणार आहे. ६ ते ७ मार्च दरम्यान हा सामना खेळला जाईल.