इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये भारतीय टेनिस खेळाडूंची शाही बडदास्त करण्यात येत आहे. खेळाडूंना शाकाहारी जेवणासह सरावासाठी खास सुविधा देण्यात येत आहे. तसेच भारतीय खेळाडूंना कडक सुरक्षा देखील पुरवण्यात आली आहे.
पाकिस्तान आशियाई अंडर-12 आयटीएफ पात्रता स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. भारताचा 8 सदस्यीय संघ या स्पर्धेसाठी इस्लामाबाद येथे पोहोचला आहे. पाकिस्तान भारतीय संघाला खास सुविधा देत आहे.
विशेष म्हणजे पहिल्यादांच भारतीय ज्यूनियर टेनिस संघ पाकिस्तानला पोहोचला आहे. याआधी भारताची डेविस कप टीम 1964 सालानंतर पाकिस्तानला अद्याप गेलेली नाही. तसेच नोव्हेंबर 2007 नंतर दोन्ही देशातील मालिकेनंतर सीनियर खेळाडू पाकिस्तानला गेलेले नाहीत. आता भारतीय अंडर-12 चा संघ पाकिस्तानला पोहोचलेला आहे. यामुळे पाकिस्तान भारतीय संघाला सुविधा देण्यात कोणतीच कसर सोडत नाहीये.
भारतीय संघात आरव चावला, ओजस मेहलावत आणि रुद्र बाथम हे पुरूष खेळाडू आहेत. तर मुलींमध्ये माया रेवती, हरिता व्यंकटेश आणि जान्हवी काजला यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय चॅम्पियन आशुतोष सिंह इस्लामाबादहून पीटीआयशी बोलताना सांगितलं की, दोहा विमानतळावर काही लोकांनी आमच्या जर्सीवर भारताचा तिरंगा झेडा पाहिला. तेव्हा पासून ते आमच्या संघात इटरेंस्ट दाखवण्यास सुरूवात केली. ते पाकिस्तानी नागरिक होते. आम्ही इस्लामाबादला जात असल्याचे कळताच ते खूश झाले. जर तुम्ही एक भारतीय खेळाडू आहात तर ते तुमच्याशी चर्चा करण्यासाठी इच्छूक असतात.
आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो. तेव्हा ते आमचे स्वागत करून खूश झाले. आम्हाला हॉटेलमध्ये पोहोचवण्यासाठी एस्कॉर्ट वाहनाचा वापर करण्यात आला. सुरक्षे संबंधी सर्व काळजी ते घेत होते. यामुळे मुलांचे आई वडिल निर्धास्त झाले. अकील खान सारखे पाकिस्तानचे अव्वल खेळाडू आमचे चांगले मित्र आहेत. ते टेनिसला राजकारणापासून नेहमी दूर ठेवतात, असे देखील सिंह म्हणाले.
मुलींच्या संघाचे प्रशिक्षक नमिता बल यांनी पाकिस्तानमध्ये मिळणाऱ्या खास पाहुणचारावर आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ते आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत होते. जान्हवी आमच्या संघात शाकाहारी आहे. तिच्यासाठी ते दररोज शाकाहारी जेवणाची व्यवस्था करत आहेत. तसेच आम्हाला सरावासाठी खास सुविधा करून देत आहेत. ते दिवसांतून आम्हाला जवळपास 10 वेळा फोन करून आम्हाला आणखी काय पहिजे का? याची विचारणा करतात.
दरम्यान, भारतीय मुलं आणि मुलीं आयटीएफ आशिया अंडर 12 स्पर्धेत आपापल्या गटात विजयाचा दावेदार आहेत. भारतीय मुलाच्या टीमने नेपाळचा 3-0 ने पराभव करत चांगली सुरूवात केली. तर मुलींनी पाकिस्तानचा 2-1 ने पराभव केला आहे.
हेही वाचा - जसप्रीत बुमराहला मागे टाकत जो रूटने जिंकला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार
हेही वाचा - माजी क्रिकेटर रमीज राजा पीसीबीचे नवे अध्यक्ष, 3 वर्षे राहणार पदावर