नवी दिल्ली - स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर इंडियन वेल्स ओपनमधील पराभवानंतर आता मियामी ओपनच्या विजयासाठी सज्ज झाला आहे. फेडररला इंडियन वेल्स ओपनच्या अंतिम फेरीत ७ व्या मानांकित आॉस्ट्रेलियाच्या डोमॅनिक थीमने ३-६, ६-३,७-५ ने मात केली होती. फेडररने नुकतेच दुबई ओपन जिंकून १०० एटीपी किताब जिंकणारा जगातला दुसरा खेळाडू बनला होता. पण इंडियन वेल्समधील पराभवामुळे त्याची एका स्थानाची घसरण होत पाचव्या स्थानी गेला आहे.
फेडररला मियामी ओपनच्या पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. ग्रीसच्या स्टेफोना त्सित्सिपासलाही पहिला सामना बाय मिळाला आहे. फेडररचा पुढचा सामना स्टेफनोसोबत होणार आहे. अग्रमानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविच, जर्मनीचा अलेक्झांडर झुवारेव्हलाही पहिला सामना बाय मिळाला आहे. त्यामुळे ते पुढच्या फेरीत गेले आहेत.
फेडरर म्हणाला, मी अजून अनेक किताब जिंकू शकतो, मी १०० एटीपी किताब जिंकल्यामुळे खुश आहे, इंडियन वेल्सच्या अंतिम फेरीत डोमॅनिककडून झालेल्या पराभवामुळे निराशा झालो असून, मी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी उतरलो असून, मियामी ओपन ही स्पर्धा जिंकण्याचा माझा मानस असल्याचेही त्याने यावेळी स्पष्ट केले.