नवी दिल्ली - स्वीत्झर्लंडचा स्टार खेळाडू रॉजर फेडररने मियामी ओपनच्या चौथ्या फेरीत धडक मारली आहे. तिसऱ्या फेरीत त्याने 103 व्या मानांकित सर्बियाच्या फिलिप क्रॅन्झिओकचा 7-5, 6-3 ने पराभव केला. फेडररचा पुढील सामना १५ व्या मानांकित रशियाच्या डॅनियल मेदवेदेवशी होणार आहे.मियामी ओपनच्या तिसऱया फेरीत स्पेनच्या डेव्हीड फेररला ३४ व्या मानांकित अमेरिकेच्या फ्रान्सीस ताईफोईने ५-७, ६-३, ६-३ ने पराभूत केले. ताईफोईचा पुढचा सामना २० व्या मानांकित बेलारूसच्या डेव्हिड गोफिनविरूद्ध होणार आहे.
BIG FOE 🙌@FTiafoe ends Ferrer's run in Miami, winning 5-7 6-3 6-3#MiamiOpen pic.twitter.com/qA6dGhxeVA
— Tennis TV (@TennisTV) March 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BIG FOE 🙌@FTiafoe ends Ferrer's run in Miami, winning 5-7 6-3 6-3#MiamiOpen pic.twitter.com/qA6dGhxeVA
— Tennis TV (@TennisTV) March 26, 2019BIG FOE 🙌@FTiafoe ends Ferrer's run in Miami, winning 5-7 6-3 6-3#MiamiOpen pic.twitter.com/qA6dGhxeVA
— Tennis TV (@TennisTV) March 26, 2019
फेडररने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पहिले दोन्ही सेट जिंकत सामना सरळ सेटमध्ये जिंकला. नुकत्याच झालेल्या इंडियन वेल्सच्या अंतिम फेरीत फेडररला ४ थ्या मानांकित ऑस्ट्रियाच्या डोमॅनिक थीमकडून ३-६, ६-३, ७-५ ने पराभव पत्करावा लागला होता. या वर्षातील फेडररचा खेळ पाहता तो १०१ वा एटीपी किताब जिंकेल यात शंका नाही. अमेरिकेच्या जिमी कॉनर्सने १०९ एटीपी किताब जिंकले आहेत. कॉनर्सनंतर १०० एटीपी किताब जिंकणारा फेडरर जगातला दुसरा खेळाडू ठरला आहे. क्ले कोर्टचा बादशाह स्पेनच्या राफेल नदालने नुकताच झालेल्या इंडियन वेल्स ओपनच्या उपांत्य फेरीतून दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यामुळे नदाल या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
The moment @rogerfederer advanced to the Round of 16! 👊
— ATP Tour (@ATP_Tour) March 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Will the 🇨🇭 win a 4th #MiamiOpen 🏆in 2019?
🎥: @TennisTV pic.twitter.com/Ttz2UD83pe
">The moment @rogerfederer advanced to the Round of 16! 👊
— ATP Tour (@ATP_Tour) March 25, 2019
Will the 🇨🇭 win a 4th #MiamiOpen 🏆in 2019?
🎥: @TennisTV pic.twitter.com/Ttz2UD83peThe moment @rogerfederer advanced to the Round of 16! 👊
— ATP Tour (@ATP_Tour) March 25, 2019
Will the 🇨🇭 win a 4th #MiamiOpen 🏆in 2019?
🎥: @TennisTV pic.twitter.com/Ttz2UD83pe
नदालच्या माघारीमुळे या सामन्यातील रंगत आता फक्त फेडरर आणि जोकोविच यांच्यात रंगेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. फेडरर आणि जोकोविच यांच्यात आतापर्यंत ४७ सामने झाले आहेत. त्यापैकी जोकोविचने २५ सामन्यात विजय मिळवले आहेत, तर फेडररने २२ सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार जोकोविच पुढे आहे. आणि सध्या जोकोविचचा फॉर्म चांगलाच आहे. जोकोविच सध्या अग्रमानांकित असून, फेडरर पहिल्या ५ मधून बाहेर फेकला गेला आहे.
अग्रमानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचने तिसऱ्या फेरीत ८३ व्या मानांकित अर्जेंटिनाच्या फेड्रीको डेलबोनिसवर ७-५,४-६, ६-१ ने मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत गाठली आहे. जोकोविचचा पुढील सामना २५ व्या मानांकित स्पेनच्या रोबर्टो बाऊटीस्टा अगतविरूद्ध होणार आहे.