लंडन - विम्बल्डन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेचा अंतिम सामना प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात होणार आहे. मैदानाच्या क्षमते एवढे प्रेक्षकांना मैदानावर येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली होती. पण यंदा ही स्पर्धा होणार असून २८ जूनपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. ग्रास कोर्टवर होणारी ही ग्रँडस्लॅम स्पर्धा पाहण्यासाठी सुरूवातीला मैदानाच्या क्षमतेतील ५० टक्के प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी असेल. पण १० आणि ११ जुलै रोजी महिला आणि पुरूष एकेरीच्या अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानावर १०० टक्के प्रेक्षकांना येण्यास परवानगी आहे. ब्रिटिश सरकारने याची घोषणा केली आहे. दरम्यान, युरोपीय फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा आणि इतर स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा - नोवाक जोकोव्हिचने पटकावलं फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद
हेही वाचा - ग्रेट कमबॅक! सचिन, लक्ष्मणने केलं जोकोव्हिचचं कौतूक