बेलग्रेड - जागतिक क्रमवारीत तिसर्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डॉमिनिक थीमने अॅड्रिया टूरच्या पहिल्या टप्प्याचे विजेतेपद पटकावले. त्याने फिलिप क्राझिनोविकचा 4-3 (7-2), 2-4, 4-2 असा पराभव केला. एका वृत्तानुसार, रविवारी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थीमला पहिल्या सेटमध्ये फिलिपबरोबर झुंज द्यावी लागली. मात्र, टाय ब्रेकमध्ये थीमने सरशी साधली.
पहिल्या सेटमध्ये 3-1 अशी आघाडी घेत क्राझिनोविचने थीमला अडचणीत आणले. परंतू थीमने तिसर्या सेटमध्ये अधिक उत्तम खेळ केला. अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या संस्थेने 13-14 जूनला ही स्पर्धा आयोजित केली होती. अंतिम सामन्यापूर्वी, क्राझिनोविकने जोकोविचला 2-1 असे पराभूत केले होते.
अॅड्रिया टूरचा दुसरा टप्पा 20-21 जून रोजी क्रोएशियाच्या जडार येथे खेळला जाईल. तर जुलैमध्ये बोस्निया हर्जगोविना येथे स्पर्धेचा समारोप होईल.
या स्पर्धेचे इतर टप्पे पॉडगोरिया आणि मॉन्टेग्रो येथे खेळले जाणार होते. परंतु कोरोनाव्हायरसमुळे ते रद्द करण्यात आले.