ETV Bharat / sports

रॉटरडॅम ओपन : बोपण्णा-शापोवालोवची उपांत्य फेरीत धडक - रोहन बोपण्णा डेनिस शापोवालोव न्यूज

बोपण्णा-शापोवालोव जोडीने जीन ज्युलियन रॉजर आणि होरिया टेकाऊचा पराभव केला. त्यांनी आधीच्या सामन्यात स्ट्रेलियाच्या जॉन पियर्स आणि मिचेल व्हीनसचा पराभव करून अंतिम-८ मध्ये प्रवेश नोंदवला होता.

Bopanna-Shapovalov in the semi-finals of Rotterdam Open
रॉटरडॅम ओपन : बोपण्णा-शापोवालोवची उपांत्य फेरीत धडक
author img

By

Published : Feb 14, 2020, 5:11 PM IST

रॉटरडॅम - भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनेडियन जोडीदार डेनिस शापोवालोव यांनी रॉटरडॅम ओपनमध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीने जीन ज्युलियन रॉजर आणि होरिया टेकाऊचा ६-२, ३-६, १०-७ असा पराभव केला. हा सामना ७४ मिनिटे रंगला होता.

हेही वाचा - बास्केटबॉलसाठी श्रेयस अय्यर गाठणार अमेरिका

बोपण्णा-शापोवालोवने आधीच्या सामन्यात स्ट्रेलियाच्या जॉन पियर्स आणि मिचेल व्हीनसचा पराभव करून अंतिम-८ मध्ये प्रवेश नोंदवला होता. त्यांनी ऑस्ट्रेलियन जोडीवर ७-६, ६-७, १०-८ अशी मात केली होती. हेन्री कोन्टीनेन आणि जीन लेनार्ड स्ट्रफ विरूद्ध जेमी मरे आणि केन स्कूपस्की यांच्यातील विजेत्यांशी बोपण्णा आणि शापोवालोव पुढचा सामना खेळतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.