ETV Bharat / sports

पॅरिस मास्टर्स : बोपण्णा-मराच जोडीची उपांत्यपूर्व फेरीत धडक - पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा २०२० न्यूज

भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेयाचा जोडीदार ओलिवर मराच यांनी पॅरिस मास्टर ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत फॅब्रिस मार्टिन आणि जीन जूलियन रॉजर यांचा पराभव केला. या विजयासह बोपण्णा-मराच जोडीने स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीत गाठली.

Bopanna-Marach enter the quarterfinals of Paris Masters
पॅरिस मास्टर्स : बोपण्णा-मराच जोडीची उपांत्यपूर्व फेरीत धडक
author img

By

Published : Nov 5, 2020, 8:10 PM IST

पॅरिस - भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेयाचा जोडीदार ओलिवर मराच यांनी पॅरिस मास्टर ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत फॅब्रिस मार्टिन आणि जीन जूलियन रॉजर यांचा पराभव केला. मार्टिन-रॉजर ही जोडी जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असून त्यांना बोपण्णा-मराच जोडीने पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीतमध्ये धडक मारली.

पहिल्या सेटमध्ये बोपण्णा-मराच जोडी पिछाडीवर होती. त्यांनी पहिला सेट ३-६ असा गमावला. यानंतर त्यांनी दुसऱ्या सेटमध्ये शानदार वापसी करत हा सेट ६-४ असा जिंकत सामन्यातीत आव्हान जिंवत ठेवले. निर्णायक सेटमध्ये १०-८ अशी बाजी मारत सामना आपल्या नावे केला.

बोपण्णाने आपला अनुभव पणास लावत ट्रायब्रेकर सेट जिंकून उपांत्यपूर्व फेरीतमध्ये प्रवेश केला. आता त्याचा सामना एडुआर्ड रॉजर-वेसलिन आणि जर्गन मेल्जर या आठव्या मानांकित जोडीशी होणार आहे. दरम्यान, बोपण्णा-मराच जोडीने दुसान लाजोविच आणि निकोला सासिच या सर्बियन जोडीचा पराभव करत दुसरी फेरी गाठली होती.

हेही वाचा - व्हिएन्ना ओपन २०२० : जोकोविचला पराभवाचा धक्का, इटलीच्या सॉन्गोने दिली मात

हेही वाचा - विम्बल्डनमध्ये खेळलेल्या खेळाडूची टेनिसमधून निवृत्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.