मेलबर्न - बार्बोरा क्राझीकोवा आणि भारतीय वंशाच्या राजीव राम यांनी सॅम स्टोसूर आणि मॅथ्यू अबडेनवर ६-१, ६-४ अशी मात करत ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले. तिसऱ्या वर्षातील त्यांचे हे दुसरे विजेतेपद आहे.
क्राझीकोवाने मेलबर्न पार्क येथे सलग तीन विजेतेपदे जिंकली आहेत. २०१९मध्ये अमेरिकेच्या रामसोबत तिने पहिले मिश्र विजेतेपद जिंकले, तर गेल्या वर्षी निकोला मेक्टिकसह तिने दुसरे विजेतेपद खिशात टाकले. तत्पूर्वी, क्राझीकोवा आणि सहकारी चेक कॅटेरिना सिनाकोवा यांचा शुक्रवारी महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत एलिस मर्टेन्स आणि आर्यन सबलेन्का यांच्याकडून पराभव झाला.
रामकडे अजूनही पुरुष दुहेरीच्या विजेतेपदाची संधी आहे. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात तो जो सॅलिसबरीसह इव्हान डोडिग आणि फिलिप पोलासेक विरुद्ध खेळणार आहे.
हेही वाचा - इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; दोन यष्टीरक्षकांचा समावेश