मेलबर्न - अव्वल मानांकित अॅश्ले बार्टीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील घौडदौड कायम ठेवली. तर दुसरीकडे गतविजेती सोफिया केनिन हिला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला.
अॅश्ले बार्टीने डारिया गावरिलोवा हिचा १ तास ३२ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ६-१, ७-६ ने पराभव करत तिसऱ्या फेरीत धडक दिली.
गतविजेती सोफिया केनिन हिचे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. केनिनला दुसऱ्या फेरीत एस्टॉनियम काइया कानेपी हिने पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ६५ व्या स्थानी असलेल्या कानेपीने चौथ्या मानांकित केनिनचा ६-३, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.
क्वितोवा, व्हिनस आणि बियांका ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर...
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरी गटात बुधवारी उलटफेर पाहायला मिळाला. दोन वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारी झेक प्रजासत्ताकची पेत्रा क्वितोवा आणि अमेरिकेची अनुभवी खेळाडू व्हिनस विल्यम्स यांना दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या क्वितोवा हिला रोमानियाच्या सोराना क्रिस्टिया हिने ६-४, १-६, ६-१ ने पराभव केला. दुसरीकडे इटलीची सारा एरिना हिने व्हिनस विल्यम्सचा ६-१, ६-० ने धुव्वा उडवला.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरी गटातील दुसऱ्या फेरीत तैवानच्या हसीह सू वेई हिने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या कॅनडाच्या बियांकाला पराभूत केले. हसीह हिने बियांकाविरुद्धचा सामना ६-३, ६-२ अशा फरकाने जिंकला.
हेही वाचा - Australian Open : नोवाक जोकोव्हिच तिसऱ्या फेरीत दाखल
हेही वाचा - Australian Open: ओसाका, हालेपची विजयी घोडदौड